You are currently viewing आत्मनिर्भरमध्ये आयुष्यात परिवर्तन, आर्थिक समृद्धी आणण्याची ताकद….

आत्मनिर्भरमध्ये आयुष्यात परिवर्तन, आर्थिक समृद्धी आणण्याची ताकद….

रोजगार उभारणीत केंद्र शासन सक्षम…

वैभववाडी आत्मनिर्भर करूया….

आमदार नितेश राणे यांचे आत्मनिर्भर भारत अंतर्गत मेळाव्यात मार्गदर्शन….

वैभववाडी प्रतिनिधी:

कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत अनेक संकटे सर्वांसमोर उभी राहिली. स्वप्न उद्ध्वस्त झाली. मात्र यातून सावरण्यासाठी आत्मनिर्भर योजनेचा नागरिकांना चांगला फायदा झाला आहे. आयुष्यात परिवर्तन, आर्थिक समृद्धी आणण्याची ताकद या आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये आहे. आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने नियोजनबद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. केंद्र शासनाच्या योजनांची माहिती घेऊन त्या दिशेने पावले टाकल्यास कोणीही बेरोजगार राहणार नाही व कोणीही उपाशी झोपणार नाही असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे व्यक्त केला. रोजगार उभारणीसाठी नागरिकांनी मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. संपूर्ण वैभववाडी तालुका आत्मनिर्भर करूया. असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले.
वाभवे – वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने आत्मनिर्भर भारत योजनेचा गरजू लाभार्थ्यांना लाभ व्हावा या उद्देशाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत मार्गदर्शन मेळावा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भरचे संयोजक, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, मतदारसंघ संयोजक प्रमोद रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सभापती अक्षता डफळे, नगराध्यक्षा समिता कुडाळकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, माजी सभापती दिलीप रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, मुख्याधिकारी सुरज कांबळे, गटविकास अधिकारी संध्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील व नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात परिवर्तन घडणार आहे. आज पासून माझी व माझ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी अजून वाढले पाहिजे. आत्मनिर्भरच्या माध्यमातून आपण हळद वाटप केली. यातून मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन होणार आहे. सांगलीचे व्यापारी या हळदीकडे लक्ष ठेवून आहेत. परंतु मी याबाबतीत स्वार्थी आमदार आहे. या उत्पादनातून माझ्या मतदारसंघातील लोकांना अधिक फायदा कसा होईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. मिसळ महोत्सवातून वैभववाडी बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. ऊस उत्पादक तालुक्यात आहेत. ऊसापासून ज्यूस बनविने. कोकणातील ज्यूस असा ब्रँड तयार झाला पाहिजे. व तो ब्रँड मुंबई सारख्या बाजारपेठेत उतरेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर झालो. असे समजणा-या पैकी मी आहे. रोजगार उभारण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. योजनांची माहिती मिळविण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आज काही लाभार्थ्यांचा सत्कार झाला. भविष्यात प्रत्येक व्यक्तीचा सत्कार झाला पाहिजे. असे काम आपण करूया असे त्यांनी सांगितले.
चौकट –
प्रत्येक युवकाने मोबाईल थोडा बाजूला ठेवून एक तास ध्येय गाठण्याच्या दिशेने वेगळा अभ्यास केला पाहिजे. रोजगार उभारणीत राज्य शासनाची भूमिका नाकर्तेपणाची आहे. पण केंद्र सरकार तुम्हाला उभं करण्यासाठी सक्षम आहे. योजनांचा अभ्यास करा व जीवनात परिवर्तन घडवा असे आवाहन नितेश राणे यांनी युवकांना केले.
अतुल काळसेकर म्हणाले, संकटाचं संधीत रुपांतर करण्याची क्षमता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे. वैभववाडी तालुका शेतीवर अवलंबून आहे. केंद्र शासनाच्या अनेक योजना शेतीवर आहेत. दोन दिवसापूर्वीचा उमेदच्या महिला मोर्चा पाहून एका दृष्टीने समाधान वाटलं. महिला सक्षम होत आहेत याचा अंदाज आला. किसान क्रेडिट कार्ड चा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. प्रधानमंत्री मच्छी संपदा योजना, पशुसंवर्धन योजना, फेरीवाल्यांसाठी चांगल्या योजना, जनधन योजना याचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जिल्ह्यात 51 हजार महिलांच्या खात्यात उज्वला गॅस चे पैसे जमा झाले आहेत. कोरोनाच्या संकटात नागरिकांना दिलासा देण्याचे काम मोदींनी केले आहे. प्रत्येकाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्या माध्यमातून 25 हजार किलो हळद वाटप करण्यात आली. त्यातून 75 हजार किलो हळद पावडर तयार होणार आहे. हा अभिनव उपक्रम आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिता कुडाळकर, सुत्रसंचालन संजय सावंत व आभार रवींद्र तांबे यांनी मानले. यावेळी अनेक लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो – वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत अंतर्गत मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना आमदार नितेश राणे व व्यासपीठावर अतुल काळसेकर, प्रमोद रावराणे, अक्षता डाफळे, शारदा कांबळे, समिता कुडाळकर, रोहन र

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − three =