You are currently viewing तळेरे हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

तळेरे हायस्कूलमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष निवडणुकांचा अनुभव

विद्यार्थी प्रतिनिधी विराज नांदलस्कर तर विद्यार्थीनीं प्रतिनिधी म्हणून मिताली चव्हाण विजयी

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय , तळेरेचा सन २०२२-२३ चा ” शालेय मंत्रिमंडळ निवडणूक” निकाल नुकताच जाहीर करण्यात आला . यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी विराज संजय नांदलस्कर तर विद्यार्थीनीं प्रतिनिधी म्हणून मिताली गोपाळ चव्हाण हे बहुमताने विजयी ठरले . यावेळी विविध मंत्रीपदासाठीही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक मंत्री स्नेहल संतोष तळेकर , सहल मंत्री सानिका अनिल बांदिवडेकर , क्रीडा मंत्री हेमांगी महेश भोगटे , फलोद्यान मंत्री मयुरी संतोष तळेकर , शिस्त मंत्री आर्या गणेश घाडी , स्वच्छता मंत्री अथर्व भूषण तळेकर , सजावट मंत्री वेद राजाराम शेळके हे उमेदवार विजयी ठरले.
निवडणूक मुख्य अधिकारी प्रा.ए.बी. कानकेकर, जेष्ठ शिक्षक सी.व्ही.काटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एन. पी.गावठे, प्रा. ए.पी.कोकरे, एस.जाधव , ए.बी.तांबे या अधिकारी वर्गाच्या सहाय्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली . तर मतमोजणी शिक्षिका डी.सी. तळेकर , पी.एम. पाटील , सहायक शिक्षक एन.बी. तडवी , पी.एन. काणेकर , व्ही.डी. टाकळे , एस.यु.सुर्वे या अधिकारी वर्गाच्या सहाय्याने करण्यात आली .
यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे संस्था व विद्यालयामार्फत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वरीष्ठ लिपीक आर. जी. तांबे , कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर , विद्यार्थी आदी उपस्थित होते.
सर्व विजयी उमेदवारांचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर , चेअरमन अरविंद महाडीक , दिलीप तळेकर , प्रविण वरुणकर , शरद वायंगणकर , संतोष जठार ,संतोष तळेकर , निलेश सोरप , उमेश कदम , विद्यार्थी , पालक यांनी अभिनंदन केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − thirteen =