You are currently viewing परुळे येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त रानभाज्यांच्या पोषण आहाराचे प्रदर्शन

परुळे येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त रानभाज्यांच्या पोषण आहाराचे प्रदर्शन

वेंगुर्ला (परुळे) :

 

सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण माह म्हणुन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने परुळे येथील अंगणवाडी मधून विविध उपक्रम राबविण्यात आले. आज परुळे येथे राष्ट्रीय पोषण माह 2022 विविध उपक्रमांनी शाळा, अंगणवाडी मध्ये साजरा करण्यात आला.

रानभाज्या प्रदर्शन, पोषक आहाराची माहीती प्रदर्शन भरवण्यात आली व चारही शाळांमधून रानभाज्यांचे पोषण आहाराचे प्रदर्शन भरविण्यात आले. परुळे बिटच्या अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका श्रीम सामंत यांच्या नेतृत्वाखाली दशावतार नाटकाच्या माध्यमातून पोषण माह 2022 जनजागृती केली. शाळांमधुन मुलांना केळीच्या पानातून पोषण आहार पूर्ण जेवण देऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + five =