You are currently viewing कोविड 19 मुळे झालेल्या विधवा व पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ द्या

कोविड 19 मुळे झालेल्या विधवा व पालक गमावलेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ द्या

– जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

 ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानात कोविड 19 मुळे एकल/विधवा झालेल्या महिलांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करा. त्याशिवाय सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने एकल/विधवा तसेच एक व दोन पालक गमावलेल्या 18 वर्षाखालील बालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्या, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले.

                जिल्हा कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. याबैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक व्ही.डी. कदम, बाल कल्याण समिती सदस्य ॲड  नम्रता नेवगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, चाईल्ड लाईनच्या सोनाली गावडे, जिल्हा कौशल्य विकास सन्वयक गौतमी राऊळ, जि.प. माता. व बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी, नगर पालिका प्रशासन अधिकारी अवधूत तावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक डी.एस. पाडवी,  होते. शासकीय मुलांचे निरिक्षण गृह बालगृह अधिक्षक बी.जी. काटकर आदी उपस्थित होते.

                जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी जिल्ह्यात कोविड-19 मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक सहाय्य मिळण्यासाठी बाल न्याय योजनेअंतर्गत 188 बालकांना सुमारे 15 लाख 88  हजार इतक्या रकमेचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यावेळी म्हणाल्या, जिल्ह्यात ‘शिबीर एक लाभ अनेक’ राबविण्यात आले यामध्ये 1 हजार 376 लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. आता उर्वरीत लाभार्थ्यांना सेवा पंधरवडा कालावधीत लाभ देण्यात यावेत. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. ‘शिबीर एक लाभ अनेक’ अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्या बद्दल प्रशासनाचे अभिनंदन करुन कणकवली नगरपंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कोवीड-19 मुळे पती गमावलेल्या महिलांना 25 हजाराची मदत देणार असल्याबाबत ठराव केल्याचे सांगितले. ही अत्यंत चांगली बाब असल्याचे सांगून, सद्या नवरात्रौत्सवात त्रिशक्तीचा सर्वत्र जागर सुरु आहे. या कालावधीत महिलांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करावे. जिल्ह्यामध्ये कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांचे पालकत्व घेण्यासाठी जनजागृती करावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 2 =