You are currently viewing सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण मांजरेकर यांचे निधन

सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण मांजरेकर यांचे निधन

देवगड :

 

देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्री रामेश्वर हायस्कुलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण महादेव मांजरेकर ( ७४ वर्ष) यांचे बागमळा येथील राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. इंग्रजी विषय सोप्या भाषेत शिकविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. अत्यंत कडक शिस्तीचे व विध्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांचे अनेक विध्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत असायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातू असा परिवार आहे. मुणगे ज्यू कॉलेजचे शिक्षक गुरुप्रसाद मांजरेकर यांचे वडील तर सेवानिवृत्त स्टेट बँक लिपिक भाई मांजरेकर व सेवानिवृत्त शिक्षक काशिनाथ मांजरेकर यांचे जेष्ठ बंधू तर कणकवली येथील उद्योजक निलेश गोवेकर यांचे काका होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा