You are currently viewing “हर घर तिरंगा ” अभियानांतर्गत, छत्रपती शिवाजी विद्यालय, ठाणे येथे जेष्ठनागरिक महादेव काठोळे, काल्हेर भिवंडी यांच्या हृस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न…

“हर घर तिरंगा ” अभियानांतर्गत, छत्रपती शिवाजी विद्यालय, ठाणे येथे जेष्ठनागरिक महादेव काठोळे, काल्हेर भिवंडी यांच्या हृस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न…

ठाणे

छत्रपती शिवाजी विद्यालय, करवालोनगर,ठाणे येथे “हर घर तिरंगा”अभियानांतर्गत ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यासाठी काल्हेर,ठाणे, येथील वयोवृद्ध जेष्ठ नागरिक मान्यवर- महादेव काठोळे उपस्थित होते, ध्वजारोहनप्रसंगी जेष्ठ नागरिक महादेव काठोळे ह्यांनी,राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवुन राष्ट्रध्वजाला सलामी दिली…
राष्ट्रीय तिरंगा ध्वजारोहन सोहळ्यास छत्रपती शिवाजी विद्यालयाचे संचालक,सन्मा-ब्रिजमणी मिश्रा, सौ-मिनाक्षी मिश्रा,हिंदी माध्यम मुख्याध्यापक- यादव सर, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका,सौ सुप्रिया हुमने तसेच हिंदी मराठी व इंग्रजी ह्या तिन्ही माध्यमाचे सर्वंच शिक्षक वृंद उपस्थित होते.,प्रमुख पाहुणे,वयोवृद्ध मान्यवर सन्मा-महादेव काठोळे ह्यांना संस्थेच्या संचालिका सौ मिनाक्षी मिश्रा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.समारोपप्रसंगी,
वयोव्रुदध महादेव काठोळे ह्यांनी छत्रपती शिवाजी विद्यालयातील सर्व मान्यवरांचे आभार मानले व उपक्रमांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन,शाळेच्या भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व्यक्त केल्या..

जगन्नाथ खराटे..ठाणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 2 =