You are currently viewing रामदास आठवले यांनी पुन्हा ५०-५० फॉर्म्युला मांडला…

रामदास आठवले यांनी पुन्हा ५०-५० फॉर्म्युला मांडला…

मुंबई:

शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा नाराजीनाट्य घडत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत यावं, अशी साद आठवलेंनी घातली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएसोबत यावं, असंही आवाहन त्यांनी केलं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घेतली. ‘शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,’ अशी ऑफर आठवलेंनी दिली.
शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. मग हे दोन पक्ष एकत्र कसे येणार, असं विचारला असता, लोकसभा निवडणुकीच्या आधीही दोन्ही पक्षांचे संबंध ताणले गेले होते. सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्यानं टीका सुरू होती. राज्यात सरकारमध्ये असलेली शिवसेना नाराज होती. पण अमित शहांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि युती झाली. त्यामुळे तणाव निवळू शकतो, अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =