You are currently viewing वनविभागाचे निवृत्त वनपाल वसंत अनंत राणे यांचे निधन

वनविभागाचे निवृत्त वनपाल वसंत अनंत राणे यांचे निधन

सावंतवाडी

वनविभागाचे निवृत्त वनपाल वसंत अनंत राणे (वय ७९ ) यांचे आज दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी वृद्धापकाळाने सावंतवाडी येथे राहत्या घरी निधन झाले. उद्या सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील वजराठ या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे .
ओटवणे, कुणकेरी, फोंडाघाट, कणकवली आदि ठिकाणी त्यांनी काम केले होते. मळगावचे वनपाल प्रमोद राणे, शिक्षक संत तुकाराम राणे यांचे ते वडील तर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या अधिपरिचारिका सौ. प्राची राणे यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, ४ मुली, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =