You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी अबीद नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी अबीद नाईक

कणकवली :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून श्री नाईक हे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काम करत आहेत. पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी समर्थपणे काम केले होते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम केले होते. पवार कुटुंबीयांशी निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे.

दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम श्री नाईक यांनी जिल्ह्यात फटाके लावत आनंद उत्सव साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी नुकतीच मुंबईत जाऊन अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती.

दरम्यान गुरुवारी त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा आपणाला विश्वास असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी सावळाराम अनावकर, विलास गावकर, , दिलीप पावसकर, राजू वरणे, इमरान शेख, निशिकांत कडुलकर, अमित केतकर व इतर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =