You are currently viewing ‘सूर्योदय गझल पुरस्कार’ गझलकार जयराम धोंगडे यांना जाहीर

‘सूर्योदय गझल पुरस्कार’ गझलकार जयराम धोंगडे यांना जाहीर

*‘सूर्योदय गझल पुरस्कार’ गझलकार जयराम धोंगडे यांना जाहीर*

नाशिक:

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक तथा जळगाव यांच्या तर्फे स्व. सर्जेराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय *‘सूर्योदय गझल पुरस्कार’* नांदेडचे कवी-गझलकार *जयराम धोंगडे* यांना जाहीर झाला आहे.

साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेल्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवार, दि.५ मार्च २०२३ रोजी नाशिक येथे मानवधन विद्यानगरीत प्रा.डॉ.नागनाथ कोतापल्ले व्यासपीठावर एक दिवसीय २० वे ‘राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य संमेलन’ आयोजित केले असून याच कार्यक्रमात साहित्यिकांना साहित्य पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

यावर्षीचा स्व.सर्जेराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय ‘सूर्योदय गझल पुरस्कार’ नांदेडचे कवी-गझलकार जयराम धोंगडे यांना राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रा. सौ. सुमन मुठे, संमेलनाध्यक्ष श्री बी.जी.वाघ-सुप्रसिद्ध लेखक तथा माजी जिल्हाधिकारी-नाशिक, उद्घाटक प्रा.डॉ.श्री पी.विठ्ठल, प्रमुख पाहुणे सेवादास श्री दलूभाऊ जैन, जेष्ठ साहित्यिक-कवी प्रा.श्री फ.मु.शिंदे, सुप्रसिद्ध लेखक तथा माजी जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीकांत देशमुख, मानवधन विद्यानगरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री प्रकाश कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.

कवी-गझलकार जयराम धोंगडे यांच्या ‘शब्दाटकी’ गझलसंग्रहाला अनेक साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. ‘कोरोनायण’, ‘जय बोले’ नंतर नुकताच त्यांचा चवथा काव्यसंग्रह ‘तिपेडी’ ९६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वर्धा येथे प्रकाशित झाला. या त्यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा