You are currently viewing एसटी सेवा सुरू करा अन्यथा पर्यायी व्यवस्था करावी.

एसटी सेवा सुरू करा अन्यथा पर्यायी व्यवस्था करावी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

वैभववाडी-सिंधुदुर्ग

एसटी हे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या प्रवासाचे हक्काचे आणि सुरक्षित साधन आहे. एसटीने १९४८ पासून आजपर्यंत अविरतपणे सेवा दिली आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटी सेवा सुरू करा अन्यथा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे व परिवहनमंत्री मा.अनिल परब यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यानी पुकारलेला संपामुळे एसटी सेवा बंद आहे. याचा दूरगामी परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवासी ग्राहक यांच्यावर होत आहे. आता शाळा, महाविद्यालय सुरू होऊन सुद्धा संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच याचा गैरफायदा खाजगी वाहनधारक घेत असून आर्थिक पिळवणूक होत आहे. शासनाने एसटी सेवा सुरू करावी अन्यथा पर्यायी व्यवस्था करुन सर्वसामान्य प्रवाशी ग्राहकांची गैरसोय टाळावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. या मेलची प्रत मा. जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग व मा.तहसीलदार वैभववाडी यांना पाठवलली आहे.
शासनाने आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष
प्रा.श्री. एस.एन.पाटील, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंखे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 11 =