You are currently viewing संवाद दिवाळी अंक २०२२ 

संवाद दिवाळी अंक २०२२ 

*संवाद दिवाळी अंक २०२२

अल्पावधीतच जगभर पोचलेला संवाद मीडिया आपल्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृत्तांत घेऊन येत असतो.
संवाद मिडियाचा केवळ ब्रेकिंग न्यूज देणे हा उद्देश नसून संपादकीय लेखातूनही वैशिष्ठ्यपूर्ण लिखाण केलं जातं. त्यामुळेच संवाद मीडिया हा वाचकांसाठी विशेष आवडीचा ठरत आहे.
संवाद मीडियामध्ये दररोज देश विदेशातील नावाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त जेष्ठ साहित्यिकांचे कविता, लेख, समाजोपयोगी माहिती असे विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित होत असते. त्यामुळे संवाद मीडियाला एक चाहता वर्ग प्राप्त झाला आहे.
संवादने संवाद दिवाळी अंक २०२१ च्या यशस्वी आगमनानंतर *दीपोत्सव २०२२* चे औचित्य साधून *संवाद मीडिया दिवाळी अंक २०२२* घेऊन चाहत्यांच्या भेटीस येत आहे.
संवाद मीडियाच्या दिवाळी अंकात नामवंत साहित्यिकांचे कथा, लेख, कविता, वेगवेगळी माहिती असे नानाविविध साहित्य, एक ना अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा खजिना असणार आहे.
*संवाद मिडियाकडून* साहित्यिक, लेखक/लेखिका, कवी/कवयित्री यांना आपले उत्तम दर्जाचे साहित्य, लेख, कथा, कविता, समाजोपयोगी माहिती संवादच्या दिवाळी अंकासाठी पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. *(साहित्य व्याकरणदृष्ट्या अचूक असले पाहिजे)*
चांगल्या, दर्जेदार निवडक साहित्यास आमच्या दिवाळी अंकात नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल.

*आपल्या साहित्यासोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, फोटो, फोन नंबर पाठवावेत. (दिवाळी अंकासाठी असे नमूद करावे)*

*संवादच्या दिवाळी अंकात साहित्य पाठविण्यासाठी संपर्क..*

*श्री.दीपक पटेकर* (कार्यकारी संपादक)
व्हाट्सअप्प नं.
📞८४४६७४३१९६ (8446743196)
ई-मेल: deepakpatekar123@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा