युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या..

युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या..

कुडाळ

सरंबळ देऊळवाडी येथील ३० वर्षीय अंकुश बापू पवार या युवकाने घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे सरंबळ देऊळवाडी येथील अंकुश पवार हा युवक शनिवार १७ एप्रिल पासून बेपत्ता होता त्याची शोधाशोध सगळीकडे करण्यात आली मात्र तो सापडून आला नाही आज रविवार १८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील बापू पवार हे पोलीस ठाणे येथे आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आले असता सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अंकुश पवार याचा मृतदेह घराजवळील विहिरीत सापडून आला याबाबत खबर मिळताच ते घटनास्थळी गेले तरी याबाबत खबर त्याचा भाऊ रामचंद्र पवार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी पोलिस कर्मचारी मंगेश जाधव इतर कर्मचारी दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा