You are currently viewing बेळगाव येथील युवकाचा शिरोडा वेळाघर समुद्रात बुडून मृत्यू

बेळगाव येथील युवकाचा शिरोडा वेळाघर समुद्रात बुडून मृत्यू

स्थानिकांना युवकाला वाचविण्यात अपयश

 

वेंगुर्ला :

 

वेंगुर्लेतील शिरोडा वेळागर येथे समुद्राच्या पाण्यात आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव देशनुर येथील अलबकश जावेद मुजावर वय 19 हा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. स्थानिक नागरिक सुरज अमरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात जाऊन त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. सुरज तसेच मदन अमरे, संतोष भगत, संजय नार्वेकर यांनी मिळून अखेर त्याला पाण्याच्या बाहेर काढला पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.

बेळगाव येथील दिलवर बुढेभाई हे आपली पत्नी, बहीण आणि भाचा या कुटुंबा सोबत शिरोडा येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण शिरोडा वेळागर येथे पोलचले. काही वेळाने सर्वजण आंघोळी साठी पाण्यात उतरले. दिलावर हे आपला भाचा अलबकश यांच्या सोबत समुद्राच्या पाण्यात आंघोळ करू लागले. तर त्यांची पत्नी व बहीण किनाऱ्यालगत पाण्यात आंघोळ करीत होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अलबकश याला पाण्याचा अंदाज न आल्याने व लाटांचा मारा सुरु असल्याने तो पुढे पुढे सरकत गेला. आणि घाबरलेल्या अलबकश याने वाचवा म्हणून आरडा ओरड सुरू केली. मामा दीलवर यांना ही धोका लक्षात आल्याने त्यांनीही मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली. समुद्रात कोणीतरी बुडत आहे हे समजताच सर्वजण किनाऱ्याकडे धावले.

अलबकश हा खोल पाण्यात गटंगळी घेत होता हे पाहून किनाऱ्यावरून सुरज अमरे, मदन अमरे, संतोष भगत यांनी पाण्यात उड्या घेतल्या. तो खूप खोल पाण्यात असल्याने सुरज अमरे याने जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात जाऊन त्याला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. पण अवघ्या दोन तीन मिनिटांचा फरकात अलबकश पाण्यात बुडाला. तरीही त्याला तसेच सुरज याने बाहेर काढले. यावेळी मदन आमरे, संतोष भगत, समीर भगत,आनंद अमरे, संजय नार्वेकर यांनी पाण्यातून किनाऱ्यावर आणण्यास मदत केली. यादरम्यान शिरोडा पोलीस दळवी यांच्या सह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ सर्वांनी त्याला शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल. परंतु पोलिसांनी त्यास मयत घोषित केले आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + eight =