सावंतवाडी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका, दंडात्मक कारवाई सुरू

सावंतवाडी शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका, दंडात्मक कारवाई सुरू

सावंतवाडी

शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांनी दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान अचानक सुरु केलेल्या कारवाईमुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारून ही कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सावंतवाडी आठवडा बाजार दिवशी या कारवाईला पोलीस प्रशासनाने सुरुवात केली. दरम्यान नागरिकांनी विनामास्क व सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव, प्रवीण सापळे, पोलीस हवालदार गवस आदिंनी ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा