You are currently viewing बांद्यात पतंजली योग समितीच्या वतीने यज्ञ, होमहवनचे प्रशिक्षण

बांद्यात पतंजली योग समितीच्या वतीने यज्ञ, होमहवनचे प्रशिक्षण

बांदा

बांदा शहरात पतंजली योग समिती बांदा तर्फे नवरात्रोत्सव कालावधी मध्ये होमहवन, यज्ञ प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक होणार आहे.
पतंजली योगसमिती बांदा चा योगवर्ग बांदा शहरात गेली सहा वर्षे दररोज सकाळी 5:30 ते 7:00 या वेळेत चालू आहे, या योगवर्गामध्ये नवरात्रोत्सव कालावधी सोमवार दि 26 सप्टेंबर 2022 ते बुधवार दि 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत “पतंजली नवरात्रोत्सव” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . सदर उपक्रमाचा एक भाग म्हणून होमहवन यज्ञ प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक होणार आहे, तरी ज्यांना या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी कृपया शेखर बांदेकर मोबाईल नं.
9823881712 यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन पतंजली योग समिती बांदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा