You are currently viewing ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’अभियानाचा लाभ घ्यावा

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’अभियानाचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

नवरात्राचा काळ हा स्त्रिशक्तीचा सन्मान काळ असतो याच कालावधीत महिलांचे आरोग्य सुदृढ आणि सशक्त रहावे यासाठी  आरोग्य विभागाच्या माध्यमातून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे  अभियान दि.28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर  2022 या कालाधित राबिण्यात येणार असलयाची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडुन देण्यात आली .

            अभियान काळात जिल्हा आरोग्य विभागाकडून महिलांच्या सुरक्षीतेसाठी तसेच विविध आरोग्य विषयक समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरासह विविध तज्ज्ञ व्यक्तीकडून समुपदेशन केले जाणार आहे. या मोहिमेत अठरा वर्षावरील सर्व स्त्रीयांची, मातांची आरोग्य विषयक तपासणी, गरोदर महिला, बालकाची आरोग्य तपासणी, रक्ताच्या चाचण्या, लसीकरण, गर्भधारणापूर्व काळजी, जननक्षम जोडपी यांना कुटुंब कल्याण कार्यक्रमाबाबत माहिती नवीन लग्न झालेली जोडप्यांना पाळणा लांबविणे, मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी विषयी समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच कर्करोग तपासणी (गर्भाशय व स्तनांचा  कर्करोग) यांची तपासणी व उपचार किंवा तज्ज्ञाकडे संदर्भीत करण्यात येतील. या मोहीमेमध्ये अतिजोखमीच्या माता, बालके यांना  विविध आरोग्य विषयक सेवा देण्यात येणार असून तज्ज्ञामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. हे अभियान रोज सकाळी 9 ते दु.2 वाजेपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध महाविद्यालयामध्ये मुलींचे समुपदेशन केले जाणार असुन निरोगी आयुष्याचात जनजागृतीही केली जाणार आहे. अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून  आवश्यक तीथे उपचार ही  केले जाणार आहेत. तरी या संधीचा जिल्ह्यातील माता भगींनीनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे  अभियानाचा कालावधि पुढीलप्रमाणे आहे. मोहिमेचा शुभारंभ दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी . कोविड लसीकरण विशेष सत्र दि. 26 सप्टेंबर  रोजी सर्व आरोग्य संस्था स्तरावार. विशेष प्रजनन व बाल आरोग्य शिबीर  प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर बुधवार दि. 28सप्टेंबर ते मंगळवार दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी . प्रधानमंत्री मातृ वंदना योजना  प्राथमिक आरोग्य स्तरावर सोमवार दि. 03 आक्टोबर 2022 . प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान खाजगी USG केंद्रावर व जिल्हा रुग्णालय सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022. आसांसर्गिक आजार सर्वेक्षण, निदान व उपचार शिबीर प्रती उपकेंद्र एक याप्रमाणे गुरुवार दि. 29 सप्टेंबर 2022 महाविद्यालय किशोरवयीन मुलीचे प्रबोधन व आरोग्य शिबीर प्रत्येक प्राथमिक आरोगय  केंद्रनिहाय 1 प्रबोधनपर कार्यक्रम शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2022. मानविकास शिबीर (वैभवाडी) बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 डिजीटल हेल्थ मिशन (आयुष्यमान भारत कार्ड) बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर 2022 सोमवार दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजन करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =