You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन सादर 

सावंतवाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन सादर 

सावंतवाडी

तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करून भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात तात्काळ कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत श्री. सांगेलकर यांनी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री.पाटील यांना निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष राघू नार्वेकर,रवींद्र म्हापसेकर,संदीप सुकी,बाळा नमशी,राज पेडणेकर,संदीप गावडे, संजय लाड आदि उपस्थित होते.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पचनवृष्टी झाली. मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी नाले तुडुंब वाहू लागले असून शेतीमध्ये पाणी घुसून भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाबरोबर कृषी विभागाने ही नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळून देण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही यावेळी उपस्थितांकडून देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 17 =