You are currently viewing राज्य फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी पांडुरंग काळे यांची निवड

राज्य फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी पांडुरंग काळे यांची निवड

*राज्य फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी पांडुरंग काळे यांची निवड*

तळेरे: प्रतिनिधी

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाची (फेडरेशन) राज्य कार्यकारणी सभा महात्मा फुले महा विद्यालय पिंपरी-पुणे येथे फेडरेशन अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर सभेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित विषय व अन्यायी शासन निर्णय,यावर चर्चा होऊन प्रलंबित विषय सोडवण्यासाठी आंदोलन उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
राज्य कार्यकारिणी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी, श्री.पांडुरंग काळे यांची संघटनात्मक व निष्ठापूर्वक कार्याची दखल घेऊन तसेच जिल्हा सेक्रेटरी पदावरील उत्तम कामगिरीचा विचार करून राज्य कार्यकारिणीने एक मताने सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून श्री.पांडुरंग काळे यांची निवड करण्यात आली.या निवडी बाबतचे पत्र राज्य अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी श्री शाळीग्राम भिरुड यांने पांडुरंग काळे यांना पाठवले आहे.या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 1 =