You are currently viewing नम्रता
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

नम्रता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखीत अप्रतिम लेख*

*नम्रता*

नम्रता ही माणसाच्या स्वभावातील अधिराणी आहे. ज्यांच्या जवळ नम्रता असते ते सगळ्यांच्या मनावर राज्य करतात .नम्रतेमध्ये प्रेम माया भरभरून वाहत असतात. रागाला शांत करण्याची ताकत नम्रतेमध्ये असते .नम्रता हा कमीपणा नसून अभिमान आहे .अवघडातील अवघड गोष्ट ही नम्रतेने सोपी होऊन जाते .नम्रता म्हणजे अहंकाराचा अंत आणि सुखाची सुरुवात असते .एकमेकाचे दुःख जाणून घेणे ,दूर गेलेल्यांना जवळ आणणे ,रागाचे प्रेमात रूपांतर करणे ,मोठ्यांचा आदर करणे.वडिलधाऱ्या मानसाचा आधार होणे, कोणाला न दुखवणे, या सगळ्यांना नम्रता एकत्र बांधून ठेवते .नम्रतेमध्ये ज्ञानाचा सागर होतो आणि दुःखाची दरी कमी होते. सुखाचे नांदी और दुःखाची चांदी होते. संत हे नम्रता समान असतात ,ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, नम्रतेने वागायला शिकवतात .

आयुष्यामध्ये पहिले गुरू असतील ते आपल्या आई वडील ते नेहमी चांगले विचार आपल्या मनामध्ये बिंबवत असतात चांगले विचार म्हणजे नम्रता .नम्रतेने वागणारा प्रत्येक व्यक्ती प्रेमळ दयाळू स्वाभिमानी स्वाभिमानी असतो

नमस्कार माझा माय मंदिरी
लाख मोलाचे दिली शिदोरी
नम्रता नांदो प्रत्येक घरी
प्रेमभाव असों अंतरी

नम्रतेच्या ग्लासात
प्रेमाचे भरावे पाणी
माया आपुलकीचा सागरात
गोड असावे वाणी.

गोड वाणी नेहमी आपल्याला नम्र वागायला शिकवते. तन-मन धनाने दान करायला शिकवते उच्च नीच भेदभाव करत नाही

नम्रता हे त्यागाचे प्रतीक आहे नम्रता ही संतांसारखी असते
अमृताची गाणी त्यांच्या मुखातून वाहत असते संत हे त्यांच्याजवळ जे आहे ते सर्वांना भरभरून देतात .वाहत्या प्रवाहासारखे प्रवाहित राहायला शिकवतात.

नम्रतेच्या मंदिरात
सुखाचे वारकरी
पांडुरंगाचे गीत गातात
विसरून सारे दुःख
अनंतात विलीन होतात.

नम्रता ही यशाचा सागर आहे पण दुःखाचा नाश करणारा परिस आहे त्यामुळे तिला हृदयात सुरक्षित करून ठेवणे हे प्रत्येक मानव जातीचे कर्तव्य समजून जपले पाहिजे

सौ भारती वसंत वाघमारे
मंचर, आंबेगाव
जिल्हा पुणे

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 3 =