You are currently viewing सलग पाचव्या वर्षी सौ. श्रद्धा कदम यांना विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार

सलग पाचव्या वर्षी सौ. श्रद्धा कदम यांना विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग पाच वर्षे विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कणकवली येथील विमा प्रतिनिधी सौ.श्रद्धा कदम यांचा सत्कार कोल्हापूर विभागाचे सीनियर डिव्हिजन मॅनेजर अभय कुलकर्णी यांनी कणकवली येथे कदम यांच्या कार्यालयात केला.

यावेळी कणकवली शाखाधिकारी सतेजा बोवलेकर,विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले आदी उपस्थित होते.
सौ. कदम गेली २५ वर्षे विमा क्षेत्रातून जनसेवा करत आहेत. खडतर मेहनत चिकाटी आणि निरलस सेवा वृत्तीच्या जोरावर त्यांनी सामान्य जनतेपासून उच्चस्तरीय जनतेपर्यंत विमा क्षेत्रात आपली विश्वासहर्ता निर्माण केली. सलग पाच वर्ष विमा क्षेत्रातील हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळून सिंधुदुर्गात विमा क्षेत्रात प्रथम स्थान पटकाविले आहे. गेली पाच वर्ष त्या डिव्हिजन मध्ये पहिल्या पाच क्रमांकात असून शाखेत पहिल्या क्रमांकावर आहेत.
कणकवली येथे त्यांचे स्वतंत्र विमा सेवा कार्यालय असून ग्राहकांना विनम्र सेवा आणि अभ्यासपूर्ण माहिती देत असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायात जनतेत विश्वासार्हता निर्माण केली. विमा पॉलिसी बरोबर ग्राहकाला अडचणीत लोन उपलब्ध करून देणे, वेळेत क्लेम मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच ग्राहकांच्या प्रत्येक कार्यात त्याला शुभेच्छा देणे, मॅच्युरिटी क्लेम वेळेत मिळवून देणे या सेवेमुळे त्यांनी विमा क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे.
कोरोना काळातही त्यांनी ग्राहकांना वेळोवेळी विमा कामाबाबत मदत केली.सलग पाच वर्ष विमा क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त केल्याने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांचे डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीनिवास पळसुले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 18 =