You are currently viewing सावंतवाडी राष्ट्रवादीकडून वेदांता फॉक्सकाँनसाठी  तहसीलदारांना निवेदन सादर; तीव्र निषेध व्यक्त

सावंतवाडी राष्ट्रवादीकडून वेदांता फॉक्सकाँनसाठी  तहसीलदारांना निवेदन सादर; तीव्र निषेध व्यक्त

सावंतवाडी

वेदांता फॉक्सकॉन चा महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरात मध्ये स्थलांतर करण्यात आल्याने महाराष्टातील युवकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील युवकांकडून रोजगार हिरावून घेऊन त्यांना बेरोजगारीच्या गर्देत या सरकारने लोटले असून, राष्ट्रवादीकडून तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका उपाध्यक्ष बाबतीस फर्नांडिस ,संतोष जोईल, काशिनाथ दुभाषी, युवक तालुकाध्यक्ष हर्षद बेग, राकेश नेवगी, चेतन बामणे ,उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सावलि पाटकर, युवती सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रियांका कांबळे, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा