You are currently viewing मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाऊंडेशनचा ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्कार जाहीर 

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाऊंडेशनचा ‘आदर्श समाजरत्न’ पुरस्कार जाहीर 

रविवार, २५ सप्टेंबर २०२२ रोजी गोवा-पणजी येथे होणार सन्मान सोहळा

कुडाळ :

जिल्ह्यातील संघटीत/असंघटित कामगारांचे नेतृत्व म्हणून सुपरिचीत स्वाभिमानी कामगार संघ, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या सामाजिक योगदानाची दखल महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यस्तरीय दुर्गा प्रेरणा सोशल फाऊंडेशनने घेत राष्ट्रीय फिनिक्स अवॉर्ड २०२३ “आदर्श समाजरत्न” पुरस्कारासाठी निवड केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील सहभाग, कष्टकरी कामगारांचे नेतृत्व, जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारा बुलंद आवाज व एक अभ्यासू नेतृत्व म्हणून असलेली ओळख आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या युवा व्यक्तिमत्वाचा रविवार दि २५ सप्टेंबर २०२३ रोजी गोवा-पणजी येथील आयोजित समारंभात सन्मान केला जाणार असल्याचे निवडपत्र संयोजक डॉ. विक्रम बसवंत शिंगाडे यांनी गावडे यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा