You are currently viewing प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मंजुरी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मंजुरी

खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मा. खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूरी देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खासदार मा. श्री. विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागातील रस्त्याची अंतिम मंजूरी केंद्र सरकारकडे दिर्घकाळ प्रलंबित होती. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी खासदार श्री. सुनिल तटकरे व मा. खासदार श्री. बाळू धानोरकर यांच्या समवेत संबंधित केंद्रीय मंत्री मा. श्री. गिरीराज सिंह यांची भेट घेवून मंजूरीसाठी विनंती केली होती. तरी सुद्धा कामे मंजूरीसाठी आवश्यक तो प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच महाराष्ट्रातील सर्व खासदारांना घेवून संबंधित मंत्री व सचिव यांचे स्तरावर बैठक घेवून त्यामध्ये सर्व खासदारांनी आक्रमकपणे भूमीका मांडली. सर्व खासदारांची आक्रमक भुमिका लक्षात घेत पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील खासदारांनी सुचविलेल्या कामांना निधीची तरतुद करुन कामे मंजूर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील एकूण 150 किमी लांबीच्या एकूण 37 रस्त्याच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − two =