You are currently viewing बाल संगोपन आणि व्यक्तिमत्व विकास ….
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

बाल संगोपन आणि व्यक्तिमत्व विकास ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*बाल संगोपन आणि व्यक्तिमत्व विकास ….*

खूप छान आणि निकडीचा विषय आहे हा, या विषयावर
चर्चा होते आहे ही फार चांगली गोष्ट आहे. कारण मुलांचे
संगोपन कसे करायचे या वर विविध मतमतांतरे आहेत नि
ते स्वाभाविकही आहे.मुलांना कसे वाढवावे हा खरेतर
कसरतीचा विषय आहे.

मुले जन्मत:च हुशार असतातच. प्रत्येक गोष्टीचे त्यांना
कुतुहल असते.प्रत्येक गोष्ट त्याना जाणून घ्यायची असते.
हात लावून पहायची असते. नकळतच घरात त्याचे शिक्षण
चालू असते व मुले अनुभवातून हळू हळू खूप गोष्टी आत्मसात
करत असतात . त्यांचे कुतुहल शमेल असेच उत्तर आपण
द्यायचे असते. घर हीच मुलांची पहिली अनुभव देणारी शाळा
असते व घरातला प्रत्येक घटक मास्तर असतो. हे कर , हे करू नको तून तो सारे शिकत असतो.आई हा त्याचा चोविस तास
मोठा गुरू असतो.ह्या गुरूची शाळा आयुष्यभर चालूच असते
अगदी मुले म्हातारी झाली तरी …! घर व घरातले वातावरण
किती सुदृढ आहे यावर ही मुलांचे भविष्य ठरत असते.

बाल मानस शास्राचा विचार करता, बाल मानस शास्र सांगते
मुलांना रागवू नये. ह्या संदर्भात प्रसिद्ध मानसशास्र तज्ञ मा.
इरावती कर्वे यांचा इ. १२ वी ला शिकवलेला एक पाठ आठवतो.त्यांनी मुले म्हणजे फुले वगैरे वगैरे, म्हणणाऱ्यांची
चांगलीच हजेरी घेतली आहे. फॅंटसीचा आधार घेऊन लिहिलेला त्यांचा तो लेख खरोखर डोळ्यात अंजन घालणारा
आहे, तो समग्रच वाचायला हवा. मुले घरात खेळत असतांना
इकडे तिकडे आदळतात, आपटतात, रस्ता ओलांडतांना भरधाव येणाऱ्या मोटारी पासून पालकांना धावत जाऊन पालकांना त्यांना ओढून काढावे लागते, १/२ वेळा ठीक आहे
पण योग्य वेळी कानउघाडणी केली नाही तर मुले काहीच
शिकत नाही व भयंकर प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते.

तसेच घरात वागतांनाही, आपले मुलांवर जीवापाड प्रेम असते
म्हणून आपण त्यांचे भरपूर लाड करत असलो तरी त्यांचे
प्रत्येकच म्हणणे व हट्ट पुरवायचा नसतो. तिथे ही तारतम्य
पाळायचे असते. काही वेळा त्यांना नाही हा शब्द ऐकण्याची
सवय व्हायलाच हवी. नाही तर मुले पालकांना वेठीस
धरतात व मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडतात. अशी सवय
त्यांना लागता कामा नये.मुलांवर संस्कार आई वडिलांचेच होतात, किंबहुना मुले आई वडिलांना कॅापी करतात. म्हणजे
बघा, आपली जबाबदारी किती वाढते? मुळात आपलेच वर्तन
शुद्ध असेल तर बाकी फार प्रश्न उरत नाहीत असे मला वाटते.
गरिबीत वाढणारी मुले तर अकाली प्रौढ होतात. गरिबीचे चटके त्यांना खूप काही शिकवून जातात. श्रीमंता घरच्या
दहा वर्षाच्या मुलाला कळणार नाहीत अशा सर्व गोष्टी
गरिबाघरच्या चार वर्षाच्या मुलाला कळतात. गरिबांची मुले
रानात वाढणाऱ्या झाडांप्रमाणे परिस्थितीशी झुंज द्यायला
शिकतात. व अनुभवाच्या शाळेतून तावून सुलाखून बाहेर पडतात.

आपल्या मुलांना मात्र ऊन वारा लागू नये म्हणून आपण नको
तितके जपतो व एका अर्थाने त्यांना कमकुवत बनवतो.खूप
गहन विषय आहे हा.एकदा मुंबईला, दादर स्टेशनवर वरती
आम्ही दादऱ्यावर उभे असतांना एक दृश्य आम्ही पाहिले ते
अजून माझ्या स्मृतीपटलावर कोरलेले आहे. एक भिकारीण व
तिची तिन मुले, पैकी एक बाळ तिच्या कडेवर होते व दुसऱ्या
हातात गाठोडे होते. सामानाची एक अवजड मोठी पिशवी
जवळच असलेल्या मुलांच्या हातात होती , दोन्ही बाजुंनी
दोघांनीही नाड्या पकडल्या होत्या ज्यांचे वय होते फक्त
दीड ते दोन वर्षें. जे नुकतेच कुठे चालायला शिकले आहेत
ते ओझे वहायला आईला मदत करत होते, नाईलाजाने का
होईना..?

कधी कधी परिस्थिती माणसाला घडवते ती अशी …!

असो , आता थांबते, कारण किती ही लिहिले तरी कमीच
आहे.
आणि हो, ही फक्त माझी आणि माझीच मते आहेत .

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १८ /०९ / २०२२
वेळ : दुपारी २/ ११

Advertisement

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 7 =