You are currently viewing राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींवर झालेल्या हल्ल्याची अजित पवारांकडून दखल – अर्चना घारे परब

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवींवर झालेल्या हल्ल्याची अजित पवारांकडून दखल – अर्चना घारे परब

 

झालेला भ्याड हल्ला सावंतवाडीच्या शांत आणि सुसंस्कृत संस्कृतीला काळीमा फासणारा

सावंतवाडी

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दखल घेतली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या तथा पक्ष निरीक्षक अर्चना घारे यांनी दिली आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी सावंतवाडी पोलिसांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. संबंधितांवर कडक कारवाई होण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे. याबाबत श्री. घारे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निंदनीय आणि निषेधार्ह आहे. सावंतवाडीच्या शांत आणि सुसंस्कृत संस्कृतीला काळीमा फासणार आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी संबधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा