You are currently viewing व्यास क्रिएशन्स आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

व्यास क्रिएशन्स आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

व्यास क्रिएशन्स यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. कधी कधी एखाद्या निसर्गरम्य स्थळाचे वर्णन करायला लेखकाला चारशे-पाचशे शब्द लागतात. मात्र तेच वर्णन एखादा चित्रकार रेषा आणि रंगांच्या मदतीनं काही मिनिटातच कागदावर उतरवू शकतो. कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे. चित्रं काढण्यासाठी भरपूर विषय आहेत. उदा. किल्ले, समुद्र, जंगलं, मंदिरं, कौलारू घरं, सणवार, उत्सव वगैरे. तेव्हा वाट कशाची बघता ? उचला तो ब्रश, बुडवा तो रंगांमध्ये आणि व्यक्त व्हा समोरच्या पांढर्‍याशुभ्र कागदावर.

शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट,चित्र कोकणातल्या पार्श्वभूमीवरचेच असायला हवे. तसेच हे चित्र आपण कुठल्याही रंगांच्या मदतीनं काढू शकता. उदा. वॉटर कलर, पोस्टर कलर, ऍक्रेलिक कलर, खडूचे रंग (पेस्टल कलर), रंगीत पेन्सिल, रंगीत स्केच पेन. त्याचप्रमाणे हे चित्र आपण कागदावर, पुठ्यावर किंवा कॅनव्हासवर देखील काढू शकता. आपले चित्र पाठवण्यासाठी सदर चित्रावर आपले नाव, गावाचा पूर्ण पत्ता व आपल्या गटाचा स्पष्ट उल्लेख करून आमच्या इमेलवर आपले चित्र पाठवावे.

04 ऑक्टोबर 2022 या अंतिम तारीख पर्यंत आपल्या चित्राचा फोटो व्यवस्थित दिसेल असा मोबाईलवर काढून 9967637255 / 8652233676 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा ई-मेल vyascreationsspardha@gmail.com करावा. वरीलपैकी काहीच शक्य नसल्यास आपले चित्र पोस्टाने आमच्या व्यास क्रिएशन, डी- १, सामंत ब्लॉक्स्, श्री घंटाळी मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (पश्चिम) या पत्त्यावर पाठवावे.

बक्षिसांचे स्वरूप महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकास रोख 3,333/- रुपये, द्वितीय क्रमांकास रोख 2,222/- रुपये, तृतीय क्रमांकास रोख 1,111/- रुपये आणि उत्तेजनार्थ स्पर्धकांना तीन बक्षिसे 1,111/- रुपयांची व्यास क्रिएशन प्रकाशित पुस्तके तर कोकण प्रांतासाठी विशेष जिल्हानिहाय पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई (उपनगर), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्पर्धकांकरिता प्रथम क्रमांकास रोख 2,222/- रुपये, द्वितीय क्रमांकास रोख 1,111/- रुपये आणि उत्तेजनार्थ तीन बक्षिसे 555/- रुपयांची व्यास क्रिएशन प्रकाशित पुस्तके देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =