*सिंधुदुर्गात बाह्यरुग्ण विभागातील लघु शस्त्रक्रीया गृहाचे लोकार्पण*
सिंधुदुर्गनगरी :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे रुग्णसेवेला अधिक सक्षम व गतिमान बनविणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील लघु शस्त्रक्रीया गृहाचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सुरू करण्यात आलेल्या या लघु शस्त्रक्रीया गृहामुळे बाह्यरुग्ण विभागातच विविध प्रकारच्या गाठींवरील व इतर किरकोळ शस्त्रक्रिया तातडीने आणि सुलभरीत्या करता येणार आहेत. यामुळे रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच वेळ आणि खर्च यांची बचत होणार आहे.
