You are currently viewing एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशन चा अवॉर्ड जाहीर

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशन चा अवॉर्ड जाहीर

एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना स्टार एज्युकेशन चा अवॉर्ड जाहीर !

सिंधुदुर्ग येथील एम.आय.टी.एम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.विशाल कुशे यांना एज्युकेशन सप्लाय अँड फ्रॅंच्यजी एक्स्पो २०२३ यांच्या कडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ठ व्यवस्थापन प्रणाली या विभागातून अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हि संस्था महाराष्ट्र शासन तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यासोबत सलंग्न आहे.प्रोफेसर.विशाल कुशे यांनी नेहमीच आपल्या कौशल्याने आणि आपल्या नेतृत्व शैलीने महाविद्यालयात प्रगतीत योगदान दिले आहे.

हा प्रतिष्ठित पुरस्कार आमदार प्रसाद लाड आणि एम.एफ.डी.सी. निधी चे अध्यक्ष फिरोज मसूलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी बी.के.सी – एम.एम.आर.डी.ए मैदान मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

उपप्राचार्य.विशाल कुशे यांच्या अभिमानास्पद यशाबद्दल एम.आय.टी.एम संस्थचे अध्यक्ष.श्री.संतोष पाल,उपाध्यक्ष.श्री.विनोद कदम ,प्राचार्य.सूर्यकांत नवले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा