You are currently viewing श्री.राधाकृष्ण सप्ताहाची सांगता पालखी प्रदिक्षणेने संपन्न

श्री.राधाकृष्ण सप्ताहाची सांगता पालखी प्रदिक्षणेने संपन्न

फोंडाघाट

श्री.राधाकृष्ण मंदिरातील सप्ताहाची सांगता पालखी प्रदिक्षणेने झाली. यावेळी भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये कुडाळ येथील हत्ती, घोडे, कोंबडा, ड्र्यगन यांनी लक्ष वेधुन घेतले. आयोजित भजन स्पर्धा आणि रेकाॅर्ड डान्स स्पर्धचे बक्षीस वितरण पार पडले. प्रथम पारितोषिक ११०००/- वैभववाडी भजन मंडळ, द्वितीय पारितोषिक ७७७७/- तांबळडेग भजन मंडळाला तर तृतीय पारितोषिक ५५५५/- बाव कुडाळ संघाला मिळाले.सर्व संघानी R.K.GROUP चे कौतुक केले.

मंडळाने केलेल्या शिस्तबद्ध आयोजनाचे यावेळी कौतुक करण्यात आले. भवीष्यात कायम आम्ही सहभाग घेवु अशी प्रतीक्रीया त्यांनी दिली. बाजारपेठेत रात्री येणाऱ्या लोकांसाठी कट्टा मित्रमंडळ गांधी चौक या ठिकाणी पाव भाजीचे मोफत वाटप रात्र भर चालु होते. याचाही आस्वाद लोकांनी घेतला. मोठ्ठी गर्दी असुनही देव श्री.राधाकृष्ण आणि श्री.मारुती यांच्या कृपेने सर्व कार्यक्रम यथासांग पार पडला.अजित नाडकर्णी यांनी R.K.GROUP ला शुभेच्छा देताना यानंतरही फोंडाघाट मधील कोणत्याही चांगल्या गोष्टीत तन, मन, धन, सर्वातपरी योगदान देवु अशी प्रतीक्रीया दिली उत्कृष्ट पखवाज वादनासाठी ११११/- बक्षीस आणि रेकाॅर्ड डान्स स्पर्धत भाग घेणाऱ्या सर्वांना उत्तेजनार्थ पारितोषिके दिली गेली. मंडळांनी अजित नाडकर्णी यांना केलेल्या सहकार्याबद्दल आभार व शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 7 =