You are currently viewing रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार भाजपचाच व कमळ चिन्हाचा असेल! – लोकसभा प्रभाग उपाध्यक्ष बाळासाहेब भेगडे.

रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार भाजपचाच व कमळ चिन्हाचा असेल! – लोकसभा प्रभाग उपाध्यक्ष बाळासाहेब भेगडे.

सिंधुनगरी

या भागातील लोकसभा उमेदवार हे भाजप पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. राज्यात बाळासाहेबांचे शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हाचाच उमेदवार असेल अशी माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा प्रवास योजनेचे प्रभाग समन्वयक संजय ऊर्फ बाळासाहेब भेगडे यांनी सिंधूनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा प्रवास योजनेमध्ये महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे.  त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याच पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला बळकटी देणे व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बाळासाहेब भेगडे यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी दौरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुनगरी येथे प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक माध्यमिक पतपेढी सभागृहात गुरूवारी संपन्न झाली. तत्पूर्वी त्याने मुख्यालय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या समन्वय समितीचे साहाय्यक माजी आमदार प्रमोद जठार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली भाजप नेते अतुल काळसेकर, भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत, संजू परब, महेश सारंग, धनंजय पात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eight =