You are currently viewing राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

व्हॉट्सॲप ग्रूप मधून काढून टाकल्याच्या रागातून हा प्रकार..

 

सावंतवाडी :

 

सावंतवाडीचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मनसे कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना त्यांच्या उभा बाजार येथील कार्यालयात घडली. या प्रकरणी सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. व्हाट्सअप ग्रुपवर झालेल्या वादावरून कौस्तुभ नाईक या व्यापारी असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला व्हॉट्सॲप ग्रूप मधून काढून टाकल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडला. याबाबत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात येत आहे. झालेली मारहाण चुकीची आहे, अशांना कदापि थारा देणार नाही, अशा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा