You are currently viewing डाक विभागामध्ये खेळाडूसाठी पदभरती

डाक विभागामध्ये खेळाडूसाठी पदभरती

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासनाच्या डाक विभागाद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि प्राविण्यधारक खेळांडुसाठी विविध पदाच्या भरतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी दिली.

            राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व प्राविण्यधारक खेळांडूनी या विविध पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भारतीय खेल महासंघाच्या संकेतस्थळावर शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावेत. तत्पूर्वी खेळाडूंच्या माहितीची छाननी करणे व फॉर्म-4 प्रमाणित करुन देण्यासाठी शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर 2021 पूर्वी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =