You are currently viewing 24 ते 26 ऑगस्ट 2022 रोजी जलक्रीडा व्यावसायिकांसाठी बोट सुरक्षितता प्रशिक्षण कार्यशाळा

24 ते 26 ऑगस्ट 2022 रोजी जलक्रीडा व्यावसायिकांसाठी बोट सुरक्षितता प्रशिक्षण कार्यशाळा

जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी यांचा लाभ घ्यावा; श्री विष्णू मोंडकर यांचे आवाहन

मालवण :

चालू पर्यटन हंगामात जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी राज्यसरकार मार्फत जलक्रीडा व्यावसायिकांना बोट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिनांक 24 ते 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. यावेळी श्री हनुमंत हेडे, पर्यटन संचानालय (DOT), कोकण विभाग, नवी मुंबई महाराष्ट्र, श्रीमती के. मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, कॅप्टन श्री. संदीप भुजबळ प्रादेशिक बंदर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन होणार आहे. या वर्षी जलक्रीडा व्यवसाय सुरु करण्यासाठी पर्यटन संचानालय नवी मुंबई यांची परवानगी आवश्यक असणार आहेे. यांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ सदर परवानगी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्थानिक जलक्रीडा व्यावसायिक व प्रशासन यामध्ये समन्वयकाची भूमिका बजावत असून जलपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित सेवा कशी देता येईल प्रशासन, पर्यटक व स्थानिक प्रशासन यांच्यामधील समन्वय कसा साधता येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.

जेटस्की, बनाना, बंपर, स्पीडबोट, नोंका विहार, वॉटरस्कुटर, पॅरॅसिलिंग तसेच स्कुबा डायव्हिंग अश्या जलक्रीडा व्यवसायाशी निगडित असणाऱ्या व्यावसायिकांनी सदर कार्यशाळेस उपस्थिती दर्शवावी, अशी विनंती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा