You are currently viewing तळेरे हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा

तळेरे हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,तळेरे येथे दि.22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन उत्साहात संपन्न झाला.
झोपेतही बहुधा ज्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे आणि म्हणूनच जे झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून काढत, असे थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची 22 डिसेंबर ही जयंती. श्रीनिवास रामानुजन यांना बालपणापासूनच गणिताची आवड होती. त्यांच्या जीवन कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्ताने 22 डिसेंबर 2012 पासून हा दिवस *’राष्ट्रीय गणित दिन’* म्हणून साजरा केला जातो.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्या.एस्.जी. नलगे यांनी केले.
प्रास्ताविकातून श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट उलगडला.गणिती सूत्रांचे स्पष्टीकरण शैक्षणिक साधनांच्या मदतीने करण्यात आले,गणिती कोडी ही घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहात त्यांची उत्तरे सांगितली. तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने गणितीय रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन पी.एन्.काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.इयत्ता पाचवी,सहावी, आठवी व नववी वर्गातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्या वतीने होणारी गणित संबोध परीक्षा घेण्यात आली होती,त्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा पेन रूपी भेट वस्तू दिल्या.

यावेळी शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर,संतोष जठार,संतोष तळेकर,प्रशालेचे मुख्या.नलगे एस्.जी., सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. प्रशालेचे मुख्य कार्य. अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,सर्व शाळा समिती सदस्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समिती सदस्य शरदजी वायंगणकर यांनी भूषविले तर सूत्रसंचालन व आभार पाटील पी.एम्.यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − eleven =