You are currently viewing शिमगोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांनी चाचणी करावी….

शिमगोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांनी चाचणी करावी….

सिंधुदुर्गनगरी 

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी 72 तासापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत ठेवणे, तसेच या उत्सवाविषयीच्या सविस्तर सूचना जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. त्या अनुषंगाने परजिल्ह्यातून येते वेळी आरटीपीसीआर चाचणी करणे शक्य न झाल्यास नागरिकांनी जिल्ह्यात दाखल होताच त्याच दिवशी संबंधित गावातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामिण रुग्णालय येथे स्वॅब टेस्ट करुन घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय येथे स्वॅब टेस्टची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब टेस्टचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित व्यक्तींनी गृह अलगीकरणात रहावे. स्वॅब टेस्टचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यास आरोग्य यंत्रणेच्या सल्ल्याने पुढील उपचाराची कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा