You are currently viewing गीतरामायण फाउंडेशनच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन…

गीतरामायण फाउंडेशनच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन…

साऱ्या जगाला कोरोनाने एक अनपेक्षित धक्का दिला आहे. अवघा विश्व अजूनही या महामारीचा संघर्ष करत असून  जनसामान्यांच्या जीवनामध्ये काही अंशी नकारात्मकता निर्माण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला या काळात आपल्या दैनंदिन जीवनात काही सकारात्मक परिणामही अनुभवायला मिळाले आहे.

म्हणूनच या अनुषंगाने गीतरामायण फाउंडेशन सावंतवाडीच्या वतीने खुली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा विषय *’कोरोना काळात आलेला सकारात्मक अनुभव’* असा ठेवण्यात आला आहे. निबंधासाठी शब्दमर्यादा १२०० ते १५०० असून तो स्वहस्ताक्षरात लिहिलेला असावा. निबंध स्कॅन करून तो व्हाट्सअप नंबर ९६५७१८१६८९ किंवा ९६०४९२५९४१ या नंबर वर दिनांक २० डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावा.

 

प्रथम तीन क्रमांकाना बांबूपासून बनवलेली आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन गीतरामायण फाऊंडेशनच्या या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन गीतरामायण फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीम. मंदा परब व कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + thirteen =