You are currently viewing मनसे चे गिरीश उपरकर यांनी शाळेतील मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

मनसे चे गिरीश उपरकर यांनी शाळेतील मुलांसोबत केला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा

सावंतवाडी

मनसे चे गिरीश उपरकर यांनी आपला वाढदिवस आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांबरोबर प्रत्यक्ष भेटून आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी येथील मुलांसमवेत त्यांनी केक कापला,मुलांना खाऊचे तसेच शैक्षणीक साहित्याचे वाटप करून मुलांची विचारपूस केली.यावेळी शाळेला आपण आपल्या परीनं नक्कीच मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्या सोबत मनसे चे सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार, आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक,  सचिव कौस्तुभ नाईक, अमितकुमार बागवे,  शाखाअध्यक्ष प्रविण आरोसकर,  नंदू परब,  मुकुंद धारगळकर,  मनोज कांबळी,  धनराज गोरे,  निखिल काणेकर आदी उपस्थित होते.

तसेच या शाळेचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक प्राणेश नाईक, कार्य वाहक गंगाराम शेळके, नंदा सावंत, क्रीडा निर्देशक नंदिनी आचरेकर, हस्तकला शिक्षिका सरोज चव्हाण, श्री गोडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्राणेश नाईक यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =