You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष नकाशे याचे युवा महोत्सवामध्ये यश

वैभववाडी महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष नकाशे याचे युवा महोत्सवामध्ये यश

वैभववाडी

मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवामध्ये वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. हर्ष संजय नकाशे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिनांक १४ व १५ सप्टेंबर,२०२२ रोजी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे झालेल्या भारतीय शास्त्रीय गायन, सुगम गायन व नाट्यसंगीत गायन या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष नकाशे याने सहभाग घेतला होता. त्याने भारतीय शास्त्रीय गायन यामध्ये रौप्य पदक, तसेच सुगम गायनामध्ये उत्तेजनार्थ व नाट्यसंगीत गायनामध्ये उत्तेजनार्थ असे उत्तम यश मिळवून महाविद्यालयाचे नाव मुंबई विद्यापीठामध्ये रोशन केले आहे.
त्याच्या या उत्तम यशस्वी कामगिरीचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालकांकडून अभिनंदन होत आहे. यापूर्वी मुंबई विद्यापीठांतर्गत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, सिंधुदुर्ग येथे दि. २४ ऑगस्ट,२०२२ रोजी झालेल्या विभागीय युवा महोत्सवामध्ये हर्ष नकाशे याने भारतीय शास्त्रीय गायन, सुगम गायन व नाट्यसंगीत गायन या तिन्ही कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून मुंबई विद्यापीठामध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी त्याची निवड झाली होती. त्याच्या या उत्तुंग यशासाठी महाविद्यालयामधील सांस्कृतिक विभाग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =