You are currently viewing खा. विनायक राऊत हे शिवसेनेतले दुसरे “जोकर राऊत”

खा. विनायक राऊत हे शिवसेनेतले दुसरे “जोकर राऊत”

भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा घणाघाती पलटवार

कोकणातील खासदार विनायक राऊत हे शिवसेनेतले दुसरे “जोकर राऊत” आहेत. काहीही विदूषकी चाळे आणि वक्तव्ये करा, पण चर्चेत रहा अशी त्यांची सध्याची अवस्था आहे. नारायणराव राणे यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांचा तीळपापड झाला होता, आता जन आशीर्वाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना मिरची झोंबली आहे. लोणची आणि पापडाच्या पुढे कोकणचा विकास नेण्याची क्षमताच नसलेल्या या बिनकामाच्या खासदारामुळेच दुर्दैवाने कोकणची औद्योगिक प्रगती रखडली आहे. नाणारसारख्या अनेक प्रकल्पांच्या मुळावर आलेल्या या दळभद्री माणसामुळे कोकणचा दीड लाखांपेक्षा अधिक रोजगार हिरावून घेतला गेला आहे, आणि आता जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना होऊन दीड लाख लोकं मरण्याची भाषा हे करत आहेत. भाजपा कार्यकर्ते सगळी काळजी घेतात आणि जनतेतही मिसळतात. घरात दडून बसूनही कोरोना होणारे पाच वर्षे तशीही लपून काढतील, पण जनतेच्या हालाचा विचार कोणी करावा? राऊत आणि त्यांच्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनतेसमोरची आव्हाने सोडवता येईनात, त्यांनी केंद्राबद्दल बोलूच नये. महाराष्ट्रात कोरोनात धान्यापासून औषधापर्यंत फक्त केंद्रच मदतीला आले, शिवसेना फक्त उद्योगपतींच्या दारासमोर जिलेटीनच्या गाड्या लावून खंडणीचेच काम करू शकते हे सिद्ध झाले. विनायक राऊतांच्या टोळीचे त्यांच्या मतदारसंघात तळाशीलच्या मच्छीमार बांधवानी जाहीर वस्त्रहरण केले आहे, तिथे त्यानी आपली लाज झाकायला लंगोट मिळतो का ते शोधावे. उगाचच केंद्राच्या विषयावर बोलून आपले अज्ञान दाखवत अवलक्षण करून घेण्याची हौस फिटवू नये, असा इशारा कणकवलीचे भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिला आहे.

या जन आशीर्वाद यात्रेनंतर नारायणराव राणेंच्या झंजावाती कार्यपद्धतीमुळे कोकणात यापुढे आपल्याला काळे कुत्रे पण विचारणार नाही, हे राऊत यांना चांगलेच माहीत आहे. म्हणूनच या यात्रेचे प्रमुख असलेले भाजपा नेते प्रमोद जठार यांच्यावर घसरत त्यांनी आपली हतबलताच एकप्रकारे व्यक्त केली आहे. त्यांना दलाल म्हणत आपली राजकीय औकात पण राऊत यांनी सिद्ध केली आहे. दलाल कोण आहेत याची काळजी राऊतांनी अजिबात करू नये. येत्या २०२४ च्या निवडणूकीत विनायक राऊतांना धंद्याला लावायची जबाबदारी मतदारसंघातील जनतेने कधीच घेतली आहे, प्रतिक्षा फक्त मुहूर्ताची आहे, असा टोला परुळेकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =