You are currently viewing जलयानांची (बोटी) नोंदणी केली नसल्यास 7 दिवसांच्या आत त्वरीत नोंदणी करुन घ्यावी

जलयानांची (बोटी) नोंदणी केली नसल्यास 7 दिवसांच्या आत त्वरीत नोंदणी करुन घ्यावी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील सागरी किनारी जलक्रीडा, प्रवासी वाहतुक व मालवाहतुक करणाऱ्या जलयानांची (बोटी) नोंदणी केली नसल्यास प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयात 7 दिवसांच्या आंत आवश्यक कागदपत्रे सादर करुन जलयानांची त्वरीत नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी केले आहे.

          सद्या उघाडीच्या हंगामामुळे (फेअर सिजन) सिंधुदुर्ग सागरी किनारी जलपर्यटन व प्रवासी व मालवाहतुकीच्या हालचाली चालु झाल्या असून जल प्रवासी व जल पर्यटकांच्या सुरक्षितेतेच्या अनुषंगाने जलयांनी तपासणी व नोंदणी करुन न घेता जल वाहतुकीचे प्रकार उघडकिस येत असुन पर्यटन व जल प्रवासी वाहतुक करणाऱ्या संघटनांनी, व्यावसायिकांनी जलयान सक्षमतेची (SEAWORTHINESS OF SHIP ) तपासणी व नोंदणी करुन घेणे आवश्यक असुन सदर प्रकरणी जलयांनी नोंदणी न करता अनधिकृत जलवाहतुक केल्यास नियमानुसार कायदेशीर करवाई करण्यात येईल.

       जिल्ह्यातील सागरी किनारी जलक्रीडा, प्रवासी वाहतुक व मालवाहतुक  करणाऱ्या जलयानांची (बोटी) नोंदणी न करता अनधिकृपणे जलवाहतुकीमुळे जीवीत व मालमत्तेस हानी पोहचण्याची  शक्यता लक्षात घेता जलप्रवासी- पर्यटक तथा लोकहितार्थ नोंदणी न करण्यात आलेल्या  जलयानांची त्वरीत नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्याकडून करुन घ्यावी.

           अनधिकृत हातपाटीने रेती उत्खनन व वाहतुक करणारी जलयाने तसेच महत्वाचे म्हणजे  सागरी सुरक्षा व अतिरिक्त कारवायांची शक्यता पाहता स्थानिक जलयांने तसेच महत्वाचे म्हणजे सागरी सुरक्षा व अतिरेकी कारवायांची शक्यता पाहता स्थानिक जलयांनांची माहिती- ओळख असणे महत्वाचे असुन विना नोंदणी जलयांनाची नोंदणी झाल्यास सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक वेळी  कारवाई करणे सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी विना नोंदणीकृत जलयानांची नोदणी होणे अत्यंत गरजेचे आहे.

          यानुसार सागरी सुरक्षा व लोकहिताची बाब लक्षात घेता 7 दिवसांत संबंधित जलयांन, बोट मालकांनी आवश्यक कागदपत्रे प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ला बंदरे समुह,वेंगुर्ला  कार्यालयास सादर करुन आपआपल्या बोटीची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदरे समुह वेंगुर्ला यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 6 =