You are currently viewing नेत्रावती एक्सप्रेस २० पासून, तर गरीब रथ एक्सप्रेस २२ पासून विजेवर…

नेत्रावती एक्सप्रेस २० पासून, तर गरीब रथ एक्सप्रेस २२ पासून विजेवर…

 

कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या नेत्रावती तसेच गरीबरथ एक्सप्रेस या दोन गाड्या विद्युत इंजिनसह चालविल्या जाणार आहेत. यातील नेत्रावती एक्सप्रेस २० सप्टेंबरपासून गरीबरथ एक्सप्रेस २२ सप्टेंबर पासून विजेवर चालवली जाणार आहेत.

कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेले असल्याने आता टप्प्याटप्प्याने यामार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनिअर चालविल्या जाणार आहेत. दरम्यान विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षापासूनच कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात आहेत. आता प्रवासी रेल्वे गाड्याही टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा