You are currently viewing व्यायामपंटूनी केल्या जिम साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी ,मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज…

व्यायामपंटूनी केल्या जिम साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी ,मोठा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज…

 

आ.वैभव नाईक यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करा.माजी खासदार निलेश राणे यांची मागणी.

मालवण :

मालवण शहरातील नगरपालिकेच्या व्यायामशाळेत नव्याने आलेले साहित्य महिनाभरात गायब झाले आहे. हे जिम साहित्य भोगस असल्याचे समजते, शासन निधीतून २५ लाखाचे दर्जेदार साहित्य आणले, असा गाजावाजा आमदार वैभव नाईक केला होता. मात्र प्रत्यक्षात जीम साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी व्यायामपटूंनी केल्या. याबाबत पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे आले असता जीममध्ये एकही साहित्य नसल्याचे चित्र समोर आले आहे. नगरपालिकेला कोणतीही माहिती न देता ठेकेदाराने साहित्य नेले असा आरोप उपस्थितांनी केला. दरम्यान या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. यामध्ये आमदार वैभव नाईक यांनी पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावा. असे पत्र मालवण पोलीस ठाण्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. जिम पाहणी करून निलेश राणे यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, गणेश कुशे, पूजा सरकारे, राजू बिडये, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, पंकज पेडणेकर, जॉमी ब्रिटो यांच्यासह अन्य उपस्थित होते.

२५ लाखाचे दर्जेदार साहित्य आणले असा गाजावाजा करून फोटोसेशन व बॅनरबाजी आमदार वैभव नाईक यांनी केली. प्रत्यक्षात जिम साहित्य दर्जाहीन असल्याचे समोर आले. व्यायाम करताना अपघात झाल्यास जबाबदार कोण? हे साहित्य नको अश्या तक्रारी वाढत होत्या. या दरम्यान जीम साहित्य गायब झाले. साहित्य परत नेले याबाबत नगरपालिका प्रशासनालाही माहिती नाही. हा कारभार म्हणजे भ्रष्टाचार आहे. याबाबत गुन्हे दाखल झालेच पाहिजे असे निलेश राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 12 =