You are currently viewing शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या मुख्याध्यापकपदी श्री सलीम तकीलदार यांची निवड.

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या मुख्याध्यापकपदी श्री सलीम तकीलदार यांची निवड.

तळेरे

साळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या मुख्याध्यापकपदी विदयलयाचे सेवाजेष्ठ शिक्षक श्री सलीम तकीलदार यांची संस्थेच्या कार्यरणीच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली.यावेळी संस्था अध्यक्ष श्री प्रदीप तेंडोलकर,संस्था सचिव श्री पद्माकर धुरी,संस्था मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सतीश साळगावकर, संस्था खजिनदार व माजी मुख्याध्यापक श्री मुकुंद धुरी ,संस्था विश्वस्त व माजी मुख्याध्यापक श्री नामदेव धुरी,संस्था संचालक श्री ज्ञानदेव चव्हाण,श्री रमाकांत धुरी ,श्री मोहन सावंत,आदी संचालक उपस्थित होते.
श्री तकीलदार सर हे गेली 31 वर्षे विद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत.इंग्रजी विषयाचे नियामक म्हणूनही त्यांनी काम केले असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाहक म्हणून कार्यरत आहेत.या पदावर काम करताना जिल्ह्यातील अनेक शिक्षकाच्या समस्या सोडवून आपल्या आपल्या संघटन शक्तीचा परिचय जिल्हावासीयांना करून दिलेला आहे.
एक अभ्यासू उपक्रमशील शिक्षक, दांडगा जनसंपर्क असणारे शिक्षक,सेवाभावीवृत्ती,सुस्वभावी अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये सांगता येतील.
मुख्याध्यापदी निवड झाल्यावर सर्व संस्थापदाधिकारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पुष्पगुच्छ देऊन सरांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांची मुख्याध्याकपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सलीम तकिलदार

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =