You are currently viewing अंत्यसंस्कारासाठी निधी ची गरज

अंत्यसंस्कारासाठी निधी ची गरज

सावंतवाडी शिवसेनेची मागणी

सावंतवाडी

कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक असलेली वैदयकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर आणि नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी आमदार दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
सावंतवाडी कुटीर रुग्णालयात मृत झालेल्या एका मृतदेहाला गुंडाळण्यावरुन वाद निर्माण झाले होते. यावेळी काहींनी आपली जबाबदारी झटकली होती. यावेळी आवश्यक असलेल्या बॅग तसेच पीपीई कीट नसल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मृतदेहाला अंत्यसंस्कारासाठी नेताना आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यासाठी निधी द्यावा,असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 1 =