You are currently viewing १७सप्टेंबर रोजी कणकवलीत मधुस्मृती कार्यक्रमाचे आयोजन..

१७सप्टेंबर रोजी कणकवलीत मधुस्मृती कार्यक्रमाचे आयोजन..

कणकवली:

१७सप्टेंबर रोजी कणकवली येथे ज्येष्ठ गजलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी ज्येष्ठ गजलकार दिलीप पांढरपट्टे व गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा सहभाग असलेला मधुस्मृती हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.वाशी येथे संपन्न झालेल्या ९ व्या अखिल भारतीय मराठी गज़ल संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या या रसिकप्रिय शायराच्या स्मृतींचा जागर करण्यासाठी गज़ल सागर प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि गज़ल मित्र परिवार यांनी मिळून ” मधु – स्मृती ” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रहार भवन, कणकवली येथे शनिवार दिनांक १७ सप्टेंबर , २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. या स्मृती सोहळ्यात ज्येष्ठ गज़लकार डॉ. दिलीप पांढरपट्टे (आय ए एस, विभागीय आयुक्त) आणि गज़ल नवाज भीमराव पांचाळे यांचा विशेष सहभाग असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =