You are currently viewing बाप्पा माझं ऐकशील का?

बाप्पा माझं ऐकशील का?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बाप्पा माझं ऐकशील का?*

बाप्पा…,
तूच सुखकर्ता..तूच दुःखहर्ता ना?
मग तूच रचित हा मायावी जगात
आजही लोक का रे सुखाच्या मागे धावतात?

तू सर्वकाही करू शकतोस…
मग, सुखी असलेल्यांना तू…
खऱ्या सुखाची जाण का करून देत नाहीस?
रस्त्यावर राहणाऱ्यांपेक्षा घरात राहणे सुख नव्हे का?
एक वेळच्या अन्नासाठी वणवण भटकण्यापेक्षा…
दोन वेळा पोटभर जेवतात ते सुखच ना?
आणि, खाल्लेलं पचतं हे तर भाग्यच..!

अनाथापेक्षा आई-बापाची साथ असते हे सुख नाही का?
हा, आई-बापाला लाथाडतात ते कर्मदरिद्रीचं रे…!
बाप्पा, अपंग नसून दोन हात पाय आहेत…
दोन्ही डोळे आहेत, अंधत्व नशिबी नाही हे सुद्धा सौख्यचं…!
डोळस असूनही समाजातील दुःख दिसत नाहीत…
त्यांना कधी रे देशील दृष्टी…?

बाप्पा, माझं ऐकशील का?

सुखी असलेल्यांना समाधान मानायला शिकवशील?
रस्त्यावर राहणाऱ्यांना छप्पर देशील का?
नासाडी करणाऱ्यांना अन्नाचे महत्त्व पटवून देशील?
आई-बाप लाथाडणाऱ्यांना आई-बाप म्हणजे कोण…हे दाखवशील?
डोळस असलेल्यांना खऱ्या सौंदर्याची जाण करून देशील??

बाप्पा…
प्राणिमात्रांमधील माणुसकी गुण माणसात आण रे?
खरंच बाप्पा…माझं ऎकशील का?

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

Advertisement

Web link
https://sanwadmedia.com/59867/

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − one =