You are currently viewing गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरुपौर्णिमा*

——————————

 

गुरु शाळेत भेटले

कुणी भेटले घरात

जे आले ज्ञान घेऊन

ते सारे थटले मनात

 

कुणी होते वडीलधारे

कुणी नोकरीत वरिष्ठ

त्यांनीही शिकवलं

जे खरं तर कनिष्ठ

 

ग्रंथ हेच गुरु तर कधी

परिस्थितीने शिकवलं

खाचखळगे ओलांडत

माणूसपण टिकवलं

 

कुतूहल, ओढ, प्रश्न

सारं शिकवत होती

आनंद केला जमा

जसे सागरात मोती

 

ज्यांनी फुलवलं मनात

संवेदनाशील स्पंदन

मनोभावे करतो आज

त्या गुरूंना वंदन

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

03.07.2023

प्रतिक्रिया व्यक्त करा