You are currently viewing देवगड – जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहीरीत उडी टाकून आत्महत्या

देवगड – जामसंडे येथील किराणा व्यावसायिकाची विहीरीत उडी टाकून आत्महत्या

देवगड

जामसंडे विष्णूनगर येथील किराणा व्यावसायिक श्रीकृष्ण मनोहर वातकर(३५) यांनी आपल्या घराशेजारील विहीरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना आज १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वा.सुमारास निदर्शनास आली.मानसिक स्थिती बिघडल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, श्रीकृष्ण वातकर हे जामसंडे विष्णूनगर येथे राहत होते.ते अविवाहीत असून तेथेच त्यांचे किराणा मालाचे दुकान होते.गेली काही वर्षे ते किराणा मालाचे दुकान चालवित होते.त्यांच्यासमवेत घरी त्याचा भाऊ व भावजय अशी एकूण तीन माणसे राहत होती.

त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशा बिघडलेल्या मानसिक स्थितीतच त्यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास घराशेजारी असलेल्या विहीरीच्या पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली.यापुर्वीही त्यांनी दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेची खबर त्यांचा भाऊ मिलींद मनोहर वातकर यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली.पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, पोलिस हवालदार राजन जाधव, आशिष कदम यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस हवालदार राजन जाधव करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा