You are currently viewing हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्क राहण्याच आवाहन
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्क राहण्याच आवाहन

सिंधुदुर्ग :

 

राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार आगमन केले असून बळी राजा सुखावला आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुक विस्कळीत झाली.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावासाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा